ग्रामपंचायत शिरवळ

मौजे शिरवळ ता.खंडाळा , जि.सातारा ची स्थापना सन १/८/१९५२ रोजी झाली. मौजे शिरवळ हे गाव जिल्‍हयापासुन ६५ कि.मी. तर तालुक्‍याच्‍या मुख्यालयापासुन चे अंतर ११ कि.मी. असुन राष्‍टीय महामार्ग क्रमांक ४ वरील आर्थिक व औदयोगिक विकास झालेले महत्‍वाचे चे ठिकाण असुन पंचक्रशीतील एक प्रगत बाजारपेठेचे ठिकाण आहे. निरा नदीकाठी दक्षिणोत्‍तर वसलेले शिरवळ हे गाव २५९ खंडाळा – वाई मतदार संघ  व ४५ सातारा लोकसभा मतदार संघात समाविष्‍ठ आहे. तसेच सध्‍या वाढत्‍या औदयोगिकरणामुळे शिरवळ गावची लोकसंख्‍या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्‍या शिरवळ गावची लोकसंख्‍या अंदाजे २५ ते ३० , ००० इतकी आहे.

कृषी विषयक माहिती 

गावचे एकुण क्षेत्रफळ – ४६१६.१३ हेक्टर
लागवडीलायक क्षेत्रफळ – ११९१.०१ हेक्टर
पोटखराबा क्षेत्र – ३२३.६२ हेक्टर
नदीचे क्षेत्रफळ – १.५ कि.मी.
मार्गरस्ते क्षेत्र – ७ कि.मी.

शेती प्रमुख पिके 

 खरीप पिके – ज्वारी , भुईमुग , भात , घेवडा , सोयाबिन.
रब्बी पिके – गहू , हरभरा , शाळू , करडई.
बारमाही पिके – उस , आले
 

शिरवळ ग्रामपंचायत कार्यकारणी

  • सरपंच- सौ. पानसरे लक्ष्मी सागर
  • उपसरपंच- श्री गुंजवटे दिलीप ज्ञानोबा
  • सदस्य- श्री राऊत सचिन पांडुरंग
  • सदस्या- सौ पिसाळ ममता अमृत
  • सदस्य- श्री तांबे विकास हेमंत
  • सदस्य- श्री रांगोळे दत्तात्रय लक्ष्मण
  • सदस्या- सौ निगडे सांगिता शंकर
  • सदस्या- सौ बेलापुरकर राधिका चेतन
  • सदस्या- सौ गिरे रुपाली विजय
  • सदस्या- सौ क्षीरसागर मंगल सतिश
  • सदस्य- श्री देशमुख सुनिल दत्ताजीराव
  • सदस्य- श्री जाधव महेश महादेव
  • सदस्या- सौ चव्हाण ज्योती दिपक
  • सदस्य- श्री खुडे संतोष सुभाष
  • सदस्या- सौ माने कविता चंद्रकांत
  • सदस्या- सौ कारळे आशा बाळासाहेब
  • सदस्या- सौ काझी रिजवाना समीर
  • सदस्य- श्री परखंडे प्रकाश सुखदेव

दळण-वळण व्यवस्था

शिरवळ ही ग्रामपंचायत असुन ती अशियाई महामार्ग AH क्र. ४७ रस्त्यावर वसली असुन गावात बसस्थानक आहे. त्याचप्रमाणे ख़ंडाळा हे तालुक्याचे ठिकाण ११ कि.मी.अंतरावर आहे जाण्यास २० मि.लागतात.शिरवळ पासून सातारा हे ६४  कि.मी.अंतरावर असुन हे जिल्ह्याचे ठिकाण आहे.शिरवळ ग्रामपंचातीपासुन रेल्वेस्थानक हे ३० कि.मी.अंतरावर लोणंद या ठिकाणी असुन ज्याण्यास १ तास लागतो.सांस्कृतिक वारसा असलेले पुणे शहर हे शिरवळ पासुन ५१ कि.मी.अंतरावर आहे जाण्यास 1 तास 30 मि. लागतात त्याचप्रमाणे विमानसेवा ही उपलब्ध आहे.

आदिलशहाचा वजीर मुस्तफ़ाखानाने २५ जुलै १६४८ रोजी शहाजी राजांना बेसावध गाठुन कैद केले. त्याबरोबर आदिलशहाने शिवाजी महाराजांचे परिपत्य करण्यासाठी …

subhan mangal