श्रीपतराव कदम महाविद्यालय

माहिती भरने चालू आहे…

Shripatrao Kadam Mahavidyalaya

फोटो संग्रह

Source:- vicharmanthan shirwal-pride facebook page

shirwal school

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली शिरवळ. आज शाळेत १ ली ते 4 थी पर्यंतचे वर्ग असून शाळेत गुणवत्ते बरोबर,सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम शिक्षक व पालक राबवत आहेत.

नुकताच शाळेने ISO मानांकन प्राप्त केले आहे. त्याच बरोबर शाळेला स्वच्छ-सुंदर, उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण प्राथमिक शाळा उपक्रमातर्गत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे.

गोदरेज कंपनीच्या यांच्या सहकार्याने शाळेत विविध प्रकल्प पूर्ण केले गेले आहेत.

विशेष आभार- श्री चव्हाण गुरुजी

zilla parishad shala shirwal

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले शिरवळ या शाळेची स्थापना १८६४ या साली झाली. म्हणजे असे म्हणता येईल कि हि शाळा स्वतंत्राच्या आधीपासून चालू आहे. त्या काळात शिरवळ परिसरात हि एकच मोठी मराठी शाळा होती इ.१ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग होते. आज हि शाळेत १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग असून शाळेत गुणवत्ते बरोबर,सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम शिक्षक राबवत आहेत.

आज सगळीकडेच मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि हि शाळा त्याला अपवाद नाही. ग्रामस्थ शाळेला मदत करतच असतात. जर ग्रामस्थानी पुढे येउन आणखी सहकार्य केले तर हि शाळा आणखी पुढे जाऊ शकते.

शाळा सरकारी असल्याने इथे कोणतीही फी आकारली जात नाही. इथे पूर्णताः शिक्षण मोफत आहे. या शाळेत सध्या १७३ मुले शिकतात (हा पट ऑक्टोबर २०१८ चा आहे)

विशेष आभार- कासुर्डे सर

फोटो संग्रह

ज्ञानसंवर्धिनी शाळा

ज्ञानमूर्तीनी मधे आंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि इंग्रजी माध्यमिक शाळा चालवते.

माहिती भरने चालू आहे…

dnyansamwardhini
adarsh vidyalaya shirwal

शाळेचा इतिहास

शिरवळ नगरीमध्ये स्थानिक शिक्षण संस्थेची स्थापना १९४७ साली कै. डॉ. सदाशिव शंकर वाळिंबे व कै.दत्तात्रय गोविंद कुलकर्णी या दोन व्यक्तींनी केली आणि त्यांनी स्थानिक पातळीवर ४ वर्षे शाळा चालविली. त्यानंतर सन १९५५ साली ही शाखा रयत शिक्षण संस्थेकडे वर्ग केली गेली.
पूर्वी शाळेला जुना राजवाड्यामध्ये भरवण्यात येत होती. आता शाळा नवीन R.C.C. इमारतीमध्ये भरत आहे.

शाळेला आजपर्यंत मिळवलेले यश-

  • सन २०१५ – १६ या वर्षी शाखेस कर्मवीर पारितोषिक प्राप्त झाले आहे.
  • रयत प्रज्ञा शोध परीक्षा, प्रश्न मंजुषा स्पर्धा यात स्थान मिळविले आहे.
  • एस.एस.सी. परीक्षेत विद्यालयाचा विद्यार्थ्यांनी केंद्रात व बोर्डाचा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.

संस्थेच्या विविध उपक्रमासाठी दिलेले सकारात्मक प्रतिसाद –

  • कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत घेतल्या जाणाऱ्या रयत प्रज्ञा शोध परीक्षा, कर्मवीर विद्याप्रबोधिनी परीक्षा, कर्मवीर जीवन चरित्र परीक्षा, प्रश्नमंजुषा स्पर्धा या उपक्रमात सहभाग असतो.
  • प्रश्नपत्रिका निर्मितीमध्ये विद्यालयातील शिक्षकाचा सहभाग असतो.
  • रयत गुरुकुल प्रकल्प सन २००८-०९ पासून सुरु आहे.
  • संस्थेचा सर्व उपक्रमामध्ये विद्यालयाचा सहभाग असतो.

विद्यार्थ्यांसाठी राबविलेले नवोपक्रम –

  • अप्रगत व प्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तास.
  • शब्दकोश स्पर्धा.
  • वाचन स्पर्धा.
  • वक्तृत्व स्पर्धा.
  • निबंध स्पर्धा.
  • विविध खेळाचे प्रशिक्षण .

शाखेचे समाजासाठी योगदान–

  • गावपातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य विषयक जागृती तसेच पर्यावरण विषयक विविध उपक्रमात सहभाग.
  • शाळेचे माजी विद्यार्थी यांनी विविश क्षेत्रात पार पडल्याचा कार्याबद्दल मान्यवरांचा शाखेचा वतीने सत्कार समारंभ आयोजीत करून त्यांचा सन्मान केला जातो.
  • कर्मवीर जयंती निमित्त ७८६ युथ क्लबचा वतीने रक्तदान शिबीर घेतले जाते.यामध्ये शाखेतील शिक्षक सह्भाग घेतात.

विद्यार्थी विकासासाठी भविष्यातील नियोजन –

  • विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु केले.
  • विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन कक्ष सुरु करणे.
  • विद्यार्थ्यांना शेती विषयक मार्गदर्शन करणे.

 

विशेष आभार- जाधव सर, तांबेकर सर

फोटो संग्रह