zilla parishad shala shirwal

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले शिरवळ या शाळेची स्थापना १८६४ या साली झाली. म्हणजे असे म्हणता येईल कि हि शाळा स्वतंत्राच्या आधीपासून चालू आहे. त्या काळात शिरवळ परिसरात हि एकच मोठी मराठी शाळा होती इ.१ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग होते. आज हि शाळेत १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग असून शाळेत गुणवत्ते बरोबर,सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम शिक्षक राबवत आहेत.

आज सगळीकडेच मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि हि शाळा त्याला अपवाद नाही. ग्रामस्थ शाळेला मदत करतच असतात. जर ग्रामस्थानी पुढे येउन आणखी सहकार्य केले तर हि शाळा आणखी पुढे जाऊ शकते.

शाळा सरकारी असल्याने इथे कोणतीही फी आकारली जात नाही. इथे पूर्णताः शिक्षण मोफत आहे. या शाळेत सध्या १७३ मुले शिकतात (हा पट ऑक्टोबर २०१८ चा आहे)

विशेष आभार- कासुर्डे सर

फोटो संग्रह