सावित्रीबाई फुले स्मारक नायगाव
क्रांतीज्योती सावित्रीबाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथे झाला. त्यांच्या माहेरचे आडनाव नेवसे पाटील होते. १८४० साली त्यांचा विवाह जोतीराव फुले यांच्याशी झाल्यावर त्या पुणे येथे गेल्या.
यानंतर महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला याच बरोबर स्त्री पुरुष समता आणि जातीयता निर्मूलन इत्यादी क्षेत्रातील मोलाचे कार्य केले. या कार्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचे हे जन्मघर ” राज्य संरक्षित स्मारक ” म्हणून घोषित केले आहे. जन्मघराच्या जतनापूर्वी हि जागा दुर्लक्षित होती. नंतर महाराष्ट्र शासनाने या वास्तूच्या तत्कालीन स्वरूपानुसार तिची पुनर्निर्माण केला.

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा चित्र स्वरुपात शिल्पसृष्टी तयार करण्यात आली आहे
