सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा चित्र स्वरुपात शिल्पसृष्टी तयार करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले स्मारकाच्या समोरच शिल्पसृष्टी. कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शिल्पसृष्टी देखभालीची जबाबदारी नायगाव ग्रामपंचायत पाहते. शिल्पसृष्टीचे लेखन संशोधन प्रा. हरी नरके यांनी केले आहे तर शिल्पकार सुनिल के. देवरे आहेत.
शिल्पसृष्टी मध्ये असलेली शिल्प
- जोतीराव – सावित्रीबाईचा विवाह
- महात्मा फुले सावित्रीबाईना शिकवताना
- सावित्रीबाईना शाळेत जाताना त्रास देणारे समाजकंटक
- पहिल्या मुलींच्या शाळेत शिकवताना सावित्रीबाईना
- देशातील पहिला अनाथश्रम
- दुष्काळात निराधार बालकांसाठी बलाश्रम चालवताना
- इत्यादी…
फोटो संग्रह
क्रांतीज्योती सावित्रीबाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथे झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई कार्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचे हे जन्मघर ” राज्य संरक्षित स्मारक ” म्हणून घोषित केले आहे…
