प्राचीन काळी सर्वसामान्य लोकांना भाषेचे ज्ञान अवगत न्हवते त्यामुळे राजाज्ञा किंवा महत्वाचे संदेश चित्र लिपीतून पाषाणांवर ( दगडावर ) कोरली जायची याला शिलालेख बोलतात. शिलालेख दिर्घकाळ टिकतात आणि त्यामध्ये बदल होऊ शकत नाही. शिलालेख लिहिण्याची सुरुवात प्राचीन भरतापासून सुरु झाल्याचे पुरावे सापडतात. तर खंडाळा येथे सापडलेली धनुगळ हि शिवकालीन असून ती ६०० ते ७०० वर्षे जुनी आहे.
साधारण धनुगळेवर गाय वासरू हे सांकेतिक चिन्ह आढळते. माझ्या मते याचा अर्थ असा की गाय म्हणजे आत्ताची पिढी आणि वासरू म्हणजे ( वंशज ) नंतरची पिढी हे सदर जमिनीचा उपभोग घेऊ शकतात असा अपेक्षित आहे. धनुगळच्या वरील बाजूस असलेले चंद्र सूर्य म्हणजे सदरची जमीन चंद्र सूर्य असेपर्यंत त्या कुटुंबाची असेल आणि धनुगळच्या खालच्या भागामध्ये राजाच्या आज्ञेचे प्रतीक म्हणून तलवारीचेही चित्रांकन केलेले याचा अर्थ सदरची जमीन राजाने त्या कुटुंबासाठी दान किंवा बक्षीस म्हणून दिली गेलेली असावी आणि लोकांनी त्यावर हक्क सांगू नये व राजाज्ञा पाळावी असा होतो.
खंडाळा येथे सापडलेली धनुगळ ही याहीपेक्षा वेगळी आहे कारण या धनुगळीवर फक्त गायीचे चित्रांकन केले आहे. तिच्या बरोबरचे वासरु नाही. तसेच तिच्या पुढे “गव्हाण” म्हणजे चारा ठेवायचे भांडे देखील कोरले आहे. माझ्या मते याचा अर्थ असा की सदरची जमीन फक्त गायी चारण्यासाठी किंवा गोशाळेसाठी राखीव ठेवण्यात आली असावी.
स्थानिकांच्या मते या जागेस गधे-गाढवाचा माळ असे नाव असल्याने या दगडावर गाढव कोरले आहे व ती गधेगळ असावी असा स्थानिकांचा समज होता परंतु जिज्ञासाच्या सदस्यांनी सदरचा दगड स्वच्छ करून त्याचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर ती गधेगळ नसून धनुगळ आहे असा निष्कर्ष निघाला हि माहिती इतिहासप्रेमी संतोष देशमुख यांनी दिली आहे.
वरील माहिती पूर्णतः बरोबर असेल असे नाही. धनुगळ हि सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी तयार केली गेली आहे याचे लिखित पुरावे उपलब्ध नाही.
विशेष आभार- श्री संतोष देशमुख