पंचायत समिती खंडाळा

सह्याद्री पर्वताच्या महादेव या उप रांगेमध्ये वसलेल्या खंडाळा तालुक्याला फार मोठा प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. जागोजागी आपल्याला त्याच्या पाऊलखुणा पाहावयास मिळतात. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सिमेवर हा तालुका वसलेले आहे. खंडाळा राष्‍टीय महामार्ग क्रमांक ४ वरील आर्थिक व औदयोगिक विकास झालेले महत्‍वाचे ठिकाण आहे. खंडाळा हा सातारा जिल्ह्यापासुन 55 कि.मी. अंतरावर आहे.

खंडाळा पंचायत समितीची स्थापना 1962 साली झाली असून आत्ता खंडाळ्याला नगरपंचायतीचा दर्जा मिळालेला आहे. हा तालुका कोकणच्या सीमे लगत आहे. परंतु कोकणच्या मनाने हा तसा कमी पावसाचाच भाग आहे. केंद्र व राज्य सरकार च्या नदी जोड प्रकल्पामुळे तालुक्याचा पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आहे. येथिल लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असुन त्याला जोड धंदा म्हणून पशुपालन हि केले जाते. तालुक्यच्या काही भागात उदा. शिरवळ, लोणंद, शिंदेवाडी, पारगाव इ. ठिकाणी MIDC असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये चार पशु वैदयकीय महाविदयालय आहेत त्यापैकी खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे क्रांतीसिंह नाना पाटिल पशु व मत्स्य महाविदयालय व खंडाळा येथे रामचंद्र धोडींबा खंडागळे हे कृषी महाविद्यालय आहे.

खंडाळा तालुक्यात बरीचशी पुरातन मंदीरे असुन त्यापैकी मोर्वे येथील श्री दत्त मंदिर हे तीर्थक्षेञ म्हणुन प्रसिद्ध आहे. पाडेगाव हे गाव निरा नदी लगत असुन याच नदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना गंगा स्नान घातले जाते.पाडेगाव मधुन या पादुका लोणंद या गावी आणल्या जातात,संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा म्हणजे लोणंद गावात एक प्रकारची जञा भरलेली असते. तसेच खंडाळा तालुक्यातील भाटघर हे गाव तेथील ब्रिटीश काळीन बांधलेल्या धरणामुळे प्रसिद्ध आहे. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेले नायगाव याच तालुक्यमध्ये आहे. या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मघराचे नुतनीकरण आणि त्यांच्या जीवनातील ऐतिहासिक घटकांना चित्र स्वरुपात शिल्पसृष्टी तयार करण्यात आले आहे.

आदिलशहाचा वजीर मुस्तफ़ाखानाने २५ जुलै १६४८ रोजी शहाजी राजांना बेसावध गाठुन कैद केले. त्याबरोबर आदिलशहाने शिवाजी महाराजांचे परिपत्य करण्यासाठी …

subhan mangal