ambabai shirwal

श्री अंबाबाई ही शिरवळची ग्रामदेवता आहे. शिरवळच्या ग्रामस्थांचे एक मोठे श्रद्धास्थान म्हणजे अंबाबाईचे. यालाच अंबाई असेहि म्हणतात. अनेकांचे ते कुलदैवत आहे. हि देवी नवसाला पावते व मोठी जागृत आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रात तुळजापूरच्या अंबाबाईला काठी नेण्याचा प्रघात फार जुना आहे. काठी हे देवतेचे प्रतिक. ही सजविलेली  काठी सुमारे वीस फूट उंच आणि ध्वजाने अलंकृत केलेली असते. या काठीवर नानाप्रकारची आभूषणे घालण्याची प्रथा आहे. ही काठी खांदयावर घेऊन चालत आलेल्या प्रथेनुसार ठराविक ठिकाणी मुक्काम होतो. या कोठीचे मानकरी ठरलेले आहेत.

दरवर्षी अक्षय तृतियेला देवीचा महोत्सव असतो आणि गावयात्रा हि असते. सारे गावकरी हा महोत्सव अत्यंत थाटामाटात साजरा करीत असतात. आज शेटे घराण्याकडेच या मंदिराची व्यवस्था आहे.

श्रीअंबाबाईची मूर्ति सायुध आहे. ती महिषासुरमर्दिनी आहे. साध्या काळ्या पाषाणाचीच असली तरी ती रेखीव व सुबक आहे. शिरवळकर तर या देवीचे भक्त आहेतच परंतु बाहेरगावीही अनेक भक्त आहेत आणि ते आठवणीने, श्रद्धेने देवीच्या उत्सवाच्या वेळी शिरवळला येऊन कुलाचाराप्रमाणे पूजाअचा नेवैध्य अर्पण करतात. चैत्र महिन्यात रामनवमीपासून या देवीचा  उत्सव चालू होतो तो वैशाख शुद्ध पौर्णिमेपर्यंत चालतो. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी देवीची मानाची काठी तुळजापूरला जाण्यासाठी मानकऱ्यांसह बाहेर पडते. प्रथेप्रमाणे तिचे प्रस्थान ठेवले जाते. मानकरी मग ही काठी बाजारपेठेत आणतात. मजल दरमजल  करीत या काठीला तुळजापूरला जायचे असल्याने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच भाविकजन बरोबर असतात. काठी रात्रभर ग्रामस्थांच्या दर्शनार्थ बाजारपेठेत राहते आणि सकाळी श्रीमंडाई देवीच्या मार्गाने तुळजापूरला जाण्यासाठी परंपरेनुसार निघते. काठीचा जाण्यायेण्याचा आणि मुक्कामाचा क्रम ठरला आहे. त्यांत बदल होत नाही.

फोटो संग्रह

Source:-

  • vicharmanthan shirwal-pride facebook page
  • Information Source: Subhanmangal Book
  • Note: Following information totally refer from Subhanmangal Book all credit goes to book writer