ग्रामपंचायत शिरवळ
मौजे शिरवळ ता.खंडाळा , जि.सातारा ची स्थापना सन १/८/१९५२ रोजी झाली. मौजे शिरवळ हे गाव जिल्हयापासुन ६५ कि.मी. तर तालुक्याच्या मुख्यालयापासुन चे अंतर ११ कि.मी. असुन राष्टीय महामार्ग क्रमांक ४ वरील आर्थिक व औदयोगिक विकास झालेले महत्वाचे चे ठिकाण असुन पंचक्रशीतील एक प्रगत बाजारपेठेचे ठिकाण आहे. निरा नदीकाठी दक्षिणोत्तर वसलेले शिरवळ हे गाव २५९ खंडाळा – वाई मतदार संघ व ४५ सातारा लोकसभा मतदार संघात समाविष्ठ आहे. तसेच सध्या वाढत्या औदयोगिकरणामुळे शिरवळ गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या शिरवळ गावची लोकसंख्या अंदाजे २५ ते ३० , ००० इतकी आहे.
कृषी विषयक माहिती
गावचे एकुण क्षेत्रफळ – ४६१६.१३ हेक्टर
लागवडीलायक क्षेत्रफळ – ११९१.०१ हेक्टर
पोटखराबा क्षेत्र – ३२३.६२ हेक्टर
नदीचे क्षेत्रफळ – १.५ कि.मी.
मार्गरस्ते क्षेत्र – ७ कि.मी.
शेती प्रमुख पिके
बारमाही पिके – उस , आले
शिरवळ ग्रामपंचायत कार्यकारणी
- सरपंच- सौ. पानसरे लक्ष्मी सागर
- उपसरपंच- श्री गुंजवटे दिलीप ज्ञानोबा
- सदस्य- श्री राऊत सचिन पांडुरंग
- सदस्या- सौ पिसाळ ममता अमृत
- सदस्य- श्री तांबे विकास हेमंत
- सदस्य- श्री रांगोळे दत्तात्रय लक्ष्मण
- सदस्या- सौ निगडे सांगिता शंकर
- सदस्या- सौ बेलापुरकर राधिका चेतन
- सदस्या- सौ गिरे रुपाली विजय
- सदस्या- सौ क्षीरसागर मंगल सतिश
- सदस्य- श्री देशमुख सुनिल दत्ताजीराव
- सदस्य- श्री जाधव महेश महादेव
- सदस्या- सौ चव्हाण ज्योती दिपक
- सदस्य- श्री खुडे संतोष सुभाष
- सदस्या- सौ माने कविता चंद्रकांत
- सदस्या- सौ कारळे आशा बाळासाहेब
- सदस्या- सौ काझी रिजवाना समीर
- सदस्य- श्री परखंडे प्रकाश सुखदेव
दळण-वळण व्यवस्था
आदिलशहाचा वजीर मुस्तफ़ाखानाने २५ जुलै १६४८ रोजी शहाजी राजांना बेसावध गाठुन कैद केले. त्याबरोबर आदिलशहाने शिवाजी महाराजांचे परिपत्य करण्यासाठी …
