नीरा नदीचा दक्षिणोत्तर वाहणाऱ्या मंडा ओढयाच्या काठावर श्रीमंडाईदेवीचे मंदिर आहे. मंडा ओढयाच्या बाजूला पूर्वेला एक छोटा दरवाजा आहे. बहुधा तो मंदिराच्या प्राकाराचा भाग असावा. त्याच्या आजूबाजूला तटबंदीचे पडके अवशेष दिसतात. मंदिराचा प्राकार फार मोठा नाही. मंदिर दक्षिणभिमुख आहे. दक्षिणेला असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पायऱ्या उतरून आपण छोट्या प्राकारात येतो. लगोलग उजव्या हाताला एक छोटी पाण्याची बावर आहे. बावर पक्की बांधलेली आहे. त्यात उतरायला पायऱ्या आहेत. बांधकाम जागोजागी ढासळलेले आहे. कधी काळी या बारवेच्या पाण्याचा उपयोग देवीच्या नित्य पूजेसाठी होत असावा. पायऱ्या उतरताच डाव्या हाताला देवीच्या सन्मुख श्रीगणेश मंदिर आहे. या उत्तराभिमुख गणपतीची मूर्ति ओबडधोबड आहे.
मंदिराच्या वर बांधलेले छत अगदीच अलिकडचे वाटते. या प्रकारातच गणपतीच्या डाव्या बाजूला आणि देवीच्या उजव्या बाजूला महादेवाचे अगदी मोडकळीला आलेले पूर्वाभिमूख मंदिर आहे. याचे नाव श्रीमंडेश्वर. सभामंडप आणि गाभाऱ्याचे बांधकाम मजबूत आणि जवळ जवळ सारखेच आहे. गाभारा साभामंडपापेक्षा थोडा खालच्या आहे. सध्य मंदिराचे नवे बांधकाम करण्याचे चालू आहे जवळ जवळ ५०% काम पूर्ण झाले आहे.