शिरवळ गावचे प्रसिद्ध व्यापारी कै. श्री. शिवराम सिताराम डोईफोडे यांची संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर असलेली श्रद्धा सर्वश्रुत आहे. हयातीत त्यांनी प्रत्येक महिन्याच्या एकादशी दिवशी ते आळंदीला दर्शनासाठी जात असत. परंतु जसजसे त्यांचे वय वाढले तसे त्यांना आळंदीला जाने येणे कठीण होऊ लागले. तेव्हा त्यांच्या स्वकमाईतून श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर बांधण्याचे ठरविले आणि दि. ९/५/१९९७ रोजी त्यांनी सदर मंदिर बांधून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ह.भ.प सदानंद महाराज आळंदीकर यांच्या हस्ते करूंन त्यांची इच्छा पूर्ण केली. आणि त्यांच्या हयातीत त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरात अर्पण केले. आज त्यांच्या पश्चात त्यांची सुनबाई सौ. रत्नप्रभा रोहिदास डोईफोडे या पूर्णपणे या मंदिराचे स्वच्छता राखणे, दैनंदिन पूजा करणे इत्यादी कामे मनापासून करतात. शिवाय दर गुरुवारी या मंदिरामध्ये शिरवळ चे भजनी मंडळ भजन करीत असतात.