सती जाणे हि प्राचीन भारतातील एक धार्मिक प्रथा आहे. ज्यात पतीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी स्वत:ला यज्ञाच्या अग्नीत समर्पण करते. हि प्रथा 1829 मध्ये ब्रिटिशांनी मोडीत काढली आणि याला बेकायदा ठरवण्यात आले.
तर खंडाळा येथील सतीआई मंदिर या प्रथेचे पुरावे देते. या मंदिरात पाषाणामध्ये स्त्रीचा हात कोरलेला आढळतो आणि शेजारी एका पाषाणामध्ये देवीची मूर्ती कोरलेली आहे. पूर्वी सती जाण्याआधी याची पूजा केली जात असावी. याचे पुरावे भेटू शकलेले नाही पण गावकरांच्या सांगण्यावरून हे सत्य असावे.