aitihasik vihir

खंडाळा गावातील महादेव मंदिरामागे असलेली ही विहीर शिवकालीन आहे असे म्हटले जाते. या विहिरीचे बांधकाम पाहता ही एक पुरातन कालीन विहीर आहे असे समजते. या विहिरी मधे उतरण्यासाठी उत्तरे ला पायर्‍यांची व्यवस्था आहे तर पूर्वेस विहिरीतून पाणी उपसण्यासाठी मोटेची व्यवस्था केलेली आढळून येते.

विहिरी मधे उतरले असता प्रवेशद्वारवरच एक शिलालेख लिहिलेला पाहण्यास मिळतो. हा शिलालेख मोडी लिपी मधे लिहिला गेलेला आहे. याचे भाषांतर पुढीलप्रमाणे

‘श्री सांब चरनी तत्पर नारो अनंत परचुरे’, ‘महाजन कसबे गोहागर निरंतर श्री शके १६५ जय नाम संवत्सरे’

तसेच विहिरीचा आतील भिंतींवर काही देवळी  असून त्यातील एका देवळी मधे गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. ही मूर्ती सुद्धा प्राचीन कालीन दगडापासून निर्मित आहे. विहिरीचा बराचसा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पूर्वीचा काळी ही विहीर गावामधील पाणीपुरवठ्याचा स्त्रोत असावी. या विहिरीवर एकून बारा मोटेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

फोटो संग्रह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *