तळघर म्हणजे पूर्वीच्या काळी मौल्यवान वस्तू लपवून ठेवण्यासाठी अथवा साठवणुकीसाठी जमिनीच्या अंशतः किंवा पूर्णपणे खाली छोटया खोल्यांची बांधणी केली जायची. युद्धामध्ये शत्रूपासून लपण्यासाठी हि याचा वापर केला जात असे.

खंडाळा येथे सापडलेल्या तळघराची लांबी १० फूट असून रुंदी १० फूट तर उंची १२ फूट आहे. रोहिदास गाढवे यांच्या घराचा पाया खोदत असताना ऐतिहासिक तळघर आढळून आले. तर येथून जवळ असलेल्या पुरातन शिवमंदिरा शेजारी ६०० वर्षांपूर्वीच्या विरगळी सापडलेल्या आहेत. या विरगळीचे सापडणे आणि तळघराची बांधकाम शैली यावरून असे स्पष्ट होते कि हे तळघर शिवकाळातील असावे. तळघरात उतरण्यासाठी अतिशय अरुंद व दगडी वाट आहे. एकावेळी एकच माणूस आत उतरू शकतो. या तळघराच्या प्रवेशद्वारावर दगडी तोडीचे झाकण होते अशी माहिती इतिहासप्रेमी श्री संतोष देशमुख यांनी दिली. या तळघराच्या भिंतीमध्ये देवळीची रचना केलेली आहे. तळघर जमिनीखाली असल्याने प्रकाशासाठी या देवळीमध्ये दिवे लावले जात असावे.

विशेष आभार- श्री संतोष

अधिक माहितीसाठी Youtube विडिओ बघू शकता

Navankur TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *