शिरवळ जवळील पांडवदरा ही १५ बौद्ध लेणींपैकी एक आहे असे समजले जाते. शिरवळ येथून जवळच दक्षिणेस सुमारे दोन तीन किलो मीटर अंतरावर पांडव दरा लेणी आहे. या लेणी काळा पाषाण खोदून अनेक छोट्या गुहा तयार केल्या आहेत. या सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगेत वसलेल्या आहेत.
पूर्वीच्या काळी पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी या लेण्यांची निर्मिती करून त्यांनी या ठिकाणी मुक्काम केला होता अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावरून या लेण्यांना पांडव लेणी असे म्हटले जाते.